मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

[ १४३ ]

नकल
श्री. शके १६६१ कार्तिक वद्य ५.

शके १६६१ सिधार्थीनाम संवत्सरे कार्तिक वा। ५ ते दिवशीं वेदमूर्ति राजश्री माहादेवभट्ट वलद गोविंदभट्ट हिंगणे साकीन का। नाशीक यांसिः--

मल्हारजी पा। वलद खंडोजी पा। होळकर मोकदम निमे व रतन पा। वलद भाउजी पा। व सटवानी पा। वलद + + येस पा। वलद + + मोकदम निमे, मौजे आडगांउ प्रा। गुलशनाबाद सरकार संगमनेर सुभे खोजिस्ते बुनियाद सन ११४९ इनामपत्र लेहोन दिल्हें, ऐसी जेः- तुह्मी गोदातीरीं अग्नहोत्री, थोर ब्राह्मण, सर्वांस पूज्य जाणोन इनाम जमीन बिघे ३० तीस, बागाईत बिघे १०, व जिराइत बिघे- २०, लायक बागांत जमीन इनाम व घर वतन करून लेंकाराचेलेंकरीं दिधला असे. तुह्मीं सुखें मौजे मा।री घर बांधणे, व जमीन कीर्द करून खात जाणें. व त्याचा महसूल होईल तो खाऊन गोदातीरीं शुभ चिंतन करीत जाणें. याचा वसूलास कोन्ही मुजाहिम होनार नाहीं. सानिनहल कोन्ही झट लावील तर, आपण समस्त गांवसंमंधे देऊन तुह्मांस कवड़ीचे झट लागणार नाहीं.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries