मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

॥ श्री ॥

शके १६७१ कार्तिक शुद्ध ९

चिरंजीव राजश्री सदोबा यांसी वाळाजी बाजीराव आशिर्वाद उपरी येथील कुशल ता। छ ७ जिल्हेज जाणोन स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष काल आह्मी वाडियांत गुरुवारीं गेलों होतों. त्यास सौभाग्यादिसंपन्न मातुश्री बाईसाहेब वाडा पहिला यांनी आह्मांस सांगितले कीं, च्यार पांच डेरे व राहुट्या व कनाता लग्नप्रसंगाकरितां देणें. कार्य जाहल्यावर आपले नेणें. ह्मणोन बोलिली. आह्मी मान्य केलें. त्यास मध्यम सामान डेरे व राहुट्या व कनाता जेजूरीस आल्याच आहेत. त्यास, सामान फार जुनें नसावें, व नवेंही नसावें. मध्यम पाहिजे. त्यांत फार थोर डेरे नलगेत. सामान पक्ष मध्यम प्रतीचे सामान.

डेरे ४                 कनाता १२, जाजमें ३

येणें प्रमाणे घेऊन येणें. कदाचित तुह्मी पुढें आलेत, तरी मागें जेजूरीस माणसें पाठऊन कनाता, डेरे, जाजमें, आणवणें. सारांश, लिहिले प्रमाणें मध्यम सामान आणणें. हे आशीर्वाद.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries