मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

[ ३४२ ]

श्री शके १६७७ आषाढ वद्य १३

अस्सल ब॥ नक्कल.

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री अप्पाजी हरी गोसावी यांसिः-

सेवक रघुनाथ बाजीराउ नमस्कार सु॥ सित खमसैन मया व अलफ. किले रामसेज येथील सबनिसी व सुभेदारी राजश्री दामोधर महादेव याज कडे आहे. त्याच्या सनदा पेशनी मा।रनिलेचे नांवे सादर आहेत. त्याप्रमाणें सबनिसी व सुभेदारी करार असे, तरी मशारनिलेचें तर्फेनें कारकून येतील त्यांचे हातें किले मजकुरी सबनिसी व सुभेदारीचें कामकाज घेऊन वेतन पेशजीचे सनदेप्रमाणें पावीत जाणें. दिक्कत न करणें. सालमजकुरापासून सबनिसी व सुभेदारी यांची चालवणें, ह्मणोन तुह्मांस रुबरु आज्ञा केलीच आहे. त्याप्रमाणें याजकडे चालवणें पेशजीच्या सनदा हवालदार व कारकून किल्ले मजकूर यांचे नावे सादर आहेत. त्याप्रमाणें यांजकडील कारकुनाचे हातें सेवा घेऊन वेतन पावीत जाणें. जाणिजे. छ. २६ सवाल आज्ञा प्रमाण.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries