मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
आश्विन शु.३ मंगळवार शके १७१५.

विनंती विज्ञापना, बाबाराव यांस दौलाचा निरोप होऊन बाहेर जिनसीपासी जाऊन राहिले. मारनिलेस सांगावयाचें तें दौलानीं सर्व सांगितलें. छ, २२ सफरी दौलाचा निरोप जाला त्यापक्षी मारनिलेनें येका दो दिवसांत निघोन जावें. परंतु सरकारांतून जाबसालापैकीं आठ फर्दा ठरुन आल्या, त्याचे जबाब ठराऊन देण्याचे राज्याजी यांस दौलानीं सांगितलें. जबाब ठरण्या करितां इतके दिवस मारिनिलेचा गुंता जाला. याउपरी आठ फर्दाचे जबाब मारिनिलेपास ठराऊन देणार. ते दिल्हे ह्मणजे येथुन निघोन तिकडे येतील. रा छ २ माहे रावल हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries