मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
( शके १७१५ ज्येष्ट शु. २ सोमवार. )

विनंति ऐसीजे. सांवतखान राजश्री रघोजी भोंसले सेनासाहेब सुभा यांजकडोन वस्त्रें षादीचे रस्मीयातीचीं घेऊन आले तीं नबाबास पावतीं केलीं, मध्यस्तास षादीचीं व गमीचीं वस्त्रें होतीं तीं द्यावीं याचा विच्यार पडला कीं यांचे पुत्रास मरून फार दिवस जाले. नबाबांनी आपला पुत्र यांस देऊन मनोधारण केले तेव्हां गमी राहिली नाही. आतां गर्मीचीं वस्त्रें दिल्यास कसें पडेल नकळे ह्मणोन याचा विचार कोणास पुसावयाचा आहे ? यांचे यांसच पुसोन द्यावें; यांस पुसल्यास हेही नका असें ह्मणतील. याजकरितां मध्यस्तांस पुसलें कीं, सेनासाहेब सुभा यांचे येथील दोन प्रतीचीं वस्त्रें आपले नांवे आहेत. यांचे देण्याचा विचार कसा? याचें उत्तर मध्यस्तांनीं केलें कीं गर्मीची वस्त्रें आहेत तीं आमचे समक्ष न आणितां तोषेखान्यांत देवावीं, व षादीचे रस्मयितीची वस्त्रें आहेत तें (तीं) मात्र आणवावीं. त्यास त्याप्रमाणें केलें. सारांश लोभ दोन वस्त्रांपावेतों सुटला नाहीं.
रा। छ ३० सवाल हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries