मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
वैशाख व. ११ मंगळवार शके १७१५.

विनंति ऐसा जे–राजश्री रघोजी भोंसलें सेनासाहेब सुभा यांजकडून सांवतखान, नबाबाकडें येण्याकरितां नागपुराहून निघोन बेदरानजीक चार कोसांवर आल्याची विनंति छ. २० सवालचे रवानगींत लिहिल्यावरून ध्यानांत आलें असेल, खान मार यांनीं, राजश्री रामचंद्र दादो यांचे चिरंजिव माधवराव येथें आहेत, त्यांजला बोलाविलें. म।। र निले गेले. त्यांसमागमें खानानीं आह्मांकडे सांगोन पाठविलें कीं 'सेनासाहेब सुभा यांची आज्ञा आह्मांस आहे कीं आधीं आपल्याकडे जावें. आपण मध्यस्ताची भेट करवून हुजुरची मुलाजमत करवावीं ऐसें आहे. यास्तव आपले भेटीस कोणे समई यावें ? इतला व्हावी,” याचा निरोप माधवराव रामचंद्र यांसमागमें पाठविला कीं, * “तुह्मांस सेनासाहेबसुभा यांची आज्ञा याप्रा। फार उत्तम आहे. यावें. " त्यावरून छ. २२ रोजीं प्रात:कालीं खान म।।र आह्माकडे आले. समागमें पंचवीस पठाण निवडक होते. भेट होऊन सेनासाहेब सुभा यांचे पत्र व वस्त्रें, लग्नाचीं आह्मांस होतीं तीं, खान म॥र यांनीं दिलीं. मध्यस्ताची व हुजुरची मुलाजमत केव्हां हें विचारिल्यावरून 'अस्तमानीं होईल ' याप्र॥ सांगोन खान मार यांस निरोप दिला. आपले स्थळास गेले. र। छ. २४ सवाल हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries