मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
(शके १७१५ वैशाख वद्य ११ मंगळवार,)

विनंति उपरि.
१ “शमषुल उमरा बहादुर यांचे षादीकरितां ममईचा जिन्नस खरिदी करविला. याजकरितां पंधरा हजारांची हुंडी त्यांजकडील पाठवावी " ऐसें लिहिलें त्या प्रें।। अजमसाहेब यांसी बोलणें जालें, यांचे ह्मणणें कीं “ ममईचा जिन्नस पांच सात हजारांचा खरिदी करविला. पंधरा हजार कशावरून गोविंदराव यांनीं लिहिलें ?'' त्यास, पांचसात हजाराचा यांनीं आणविल्या प्रों जिन्नस खरीद व्हावा. पंधरा हजारांचें प्रयोजन नाहीं. अधिक खरिदी करूं नये, याचे ऐवजाची हुंडी यांजपासोन घेऊन येकादो दिवसीं रवाना होईल.

१ “मोहराचे खरिदीच्या ऐवजाची हुंडी लौकर यावी; ' ह्मणोन लि'॥. त्यास, येकादो दीवसांत हुंडी खाना होईल.
२ दोन कलमें, र।। छ. २४ सवाल हे विनंति.
छ. ३० रोजीं रवाना टपा.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries