मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
ज्येष्ठ व. २ मंगळवार शके १७१५.

राजश्री याविराजीत राजमान्य राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी.

पो गोविंदराव कृष्ण सा नमस्कार विनंति, उपरि, येथील कुशल जाणून स्वकीयें लिंहित जावें. विशेष—मौजे शिरसांव पा हवेली परंडा जागीर-राजश्री राव रंभाजी जयवंत निंबाळकर यांची-तेथीलं व मौजे देगांव पा बारसी या दोगांवचे सिवेचा कजिया बहुत दिवस, सा पांच चाहूर जमीन आज पावेतों मोहगम पडिक अनामत असतां सालगुदस्ता मौजे देगांव व कांदेलगांव पा बारसी या दोगावांनीं अनामत राण जबरदस्तीनें पेरलें. तेव्हां सिरसांघकराचा त्यांचा कजिया जाला. बारसीकर कमाविसदारांनीं सरकारांत गैरवाका समजाऊनः सिरसांवची जमीन-कदीम पांच चाहूर कजीयाची व जदडि साडेबारा चाहूर येकूण-साडेसतरा चाहूर जमीन सिरसांव येथील जप्त केली. कमाविसदारांनी वाडा बांधून जमीन वहिवाटावयास लागले. येविषंई राव मारनिले यांनी तुह्मास पांच चार वेळां लि सिरसावकर रयेत येक वर्ष पुण्यांत बसले. परंतु बंदोबस्त न जाला. दिवस लावणीचे. त्यांत यांची जमीन देगांवकर व कांदलगांवकर जप्तीचे.राण पेरतात. सा सिरसावची रयेत उठोन बेदरास आली.. गांवची खराबी ज़ाली. राव मारनिले यांचें ह्मणे कीं “ याप्र। गैरवाजबी होणें हें उचित कीं काय ? '' त्यावरून लि॥ असे. तरी सालगुदस्ता मौजे म॥राचा माल च ऐवज नेला असेल तो माघारी देवऊन वाजवीचे रुईनें नवी जमीन रेटंली तिची मोकळीक व्हावीं, कदीम पांच चाहूर कजियाचा निर्णय होऊन ठरेल त्या प्र॥ दोहीं गांवांनी वर्तावे. येविषीं तुह्मीं राजश्री नाना यांस विनंति करून बंदोबस्त करून घ्यावा.

र॥ छ० १५ जिलकाद बहुत काय लिहिणें लाभ कीजे हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries