मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
आषाढ वा ७ सोमवार शके १७१५.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदराव स्वामीचें सेवेसी.

पो। गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति. उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें लिहित जावें. विशेष तो मानूर मौ बीड हा तालुका नवाब शमशूल उमरा बाहादुर यांजकडे आहे. तेथील अमिली अबदुल समदखां यांजकडे आहे. खान मार यांनीं आपल्याकडून तेथें नरसिंगराव नायब यांस ठेविलें. त्याजकडे हिसेबकितेबाचा लडा सबब त्याजला कैद केलें. त्यास तेथील मोकासी माहरणवर वगैरेनीं राजश्री पाटिलबावा यांस गैरवाका समजाऊन तालुकियास लोक पाठवून उपसर्ग करणार ह्मणून बोभाट आला. त्यावरून राजश्री नाना यांस पत्र दिल्हें आहे. येविषीं तुह्मीं विनंति करून बंदोबस्त करावा. तालुकियांतील जमीदारास पुण्यास येण्याविसीं पत्रें पाठविलीं वगैरे उपद्रव फार केला आहे. यास्तव येविषीं बोलून बंदोबस्त करून लेहून पाठवावें. शमषुल उमरा यांजकडील पागेचा तालुका तो नवाबाचा खासगत तालुका यास्तव याचा बंदोबस्त जरूर होणें. येणेंकरून नवाबाचा संतोष हें समजावें. र॥ छ २० जिल्हेज बहुत काय लिं ? हे विनंति.
छ. २१ जिल्हेजीं रावरंभा यांनीं मागितलें सबब.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries