मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
श्रावण व. २ शुक्रवार शके १७९३.

विनंति विज्ञापना. नवाबाचे येथें इंग्रजांचीं व फरासीस यांची लढाई विलायेतेमध्यें पांच चार वेळां जाली त्याचा अखबार पारसी आली ती व दुसरी अखबार चिनापटणाहून सवदागिरानी पाठविली. ती दुख्तसर आहे व हाल छ ६ जिल्हेची अखबार मछली बंदरास नवाबाकडील वकील आहे. त्यांणी पाठविली, ती मोहरमचे समारंभांत नवाबास पावती जाली नवती. तिची नकल येक गृहस्थापासोन घेतली; याउपरी नबाबास पावती होणार एकूण तीन अखबारेच्या नकला सेवेसीं रवाना केल्या आहेत. त्याजवरून ध्यानांस येईल.
१ प्रथम अखबारेचा बंद पाठपोट भरून लिहिला आहे.
१ दुसरी अखबार चिनापटणाहून सवदागरांनीं लिलिली त्याचा एक वर्ख.
१ तिसरी अखबार मछलीबंदराहूनवकालतराम यांणीं प।। तिचा येक बंद येक तर्फा.---
----

- तीन अखबारा फारसी पाठविल्या आहेत, त्याजवरून ध्यानांत येईल
र॥ळ १५ मोहरम हे विज्ञापना,
इष्टवट इंग्रजाकडील वकील येथें आहे त्यांणीं यांस अखबार विलायेतेहून आली ते दिल्ही, तिचीं नकल हे असे.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries