[ १२७ ]                                   ।। श्री ।।        ४ मार्च १७५९.

सेवेसी विज्ञापना. येथील वर्तमान त॥ छ ४ रजबपर्यत यथास्थित असे. विशेष. स्वामींनीं भवानी आवरी व गुणाजी भोता खिजमतगार याजबरोबर शिक्केकटार राजश्री नाना पुरंधरे याचे घरीं सासवडीं होती ती देऊन पाठविली ते पावली. आज्ञा कीं तुह्मीं तेथे राहाल तोंपर्यंत तुह्याजवळ शिक्केकटार ठेवणें. तुह्मी येऊ लागाल तेव्हां शिक्केकटार सासवडास नाना पुंरधरे यांजकडे पावती करणें. ह्यणून आज्ञा. त्याप्रें॥च होईल. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries