[१३५]                                        ।। श्री ।।                          २० आक्टोबर १७५९.

.पु।। तीर्थरूपराजश्री गोविंदपंतदादा वडिलांचे सेवेसीः
विज्ञापना. श्रीमंत राजश्री माधवराव यांणी मजला आज्ञा केली कीं पंतास लिहून आरणें१८४ ४, उत्तम, लढावयासी योग्य असे आणून देणें. ह्मणोन आज्ञा केली, त्यावरून वडिलांस पेशजी लिहिलें आहे. तरी आरणें उत्तम तरणें बळकट चांगलें चार आधीं यावें. नित्य आह्मांस पुसतात कीं पंतास लिहिलें कीं नाहीं ऐसें नित्य पुसतात याजकरितां जलदीनें पाठवावें. मित्ति भाद्रपद वद्य १४ हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries