[१४९]                                        ।। श्री ।।                      २९ डिसेंबर १७५९.

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री जनार्दनपंतदाजी स्वामीचे सेवेसीः –

पोष्य बाबूराव नरसी कृतानेक नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असिलें पाहिजे. विशेष. सांप्रत पत्रें येऊन वर्तमान कळत नाहीं. तरी ऐसें न कीजे. सदैव परामृश करीत असावें. देशींचें वर्तमान तरी मोगलासी बिघाडाचा मजकूर जाला. थोरले श्रीमंत येथें +सिद्धटेकावरी एका दो रोजी पुढें जातील. श्रीमंत भाऊसाहेब राक्षसभुवनांतून दोन मजली पुढें गेले. मोगल दाहा लक्षाची जाहागीर व परांडे येथील किल्ला देत होता, परंतु श्रीमंती मान्य केलें नाहीं. त्याचे गळा पडावयाचा मजकूर आहे. आठा पंधरा रोजांत गांठ पडावी ऐसें आहे. सविस्तर वरचेवर लिहीतच आहों. राजश्री चिटकोपंत सुखरूप आहेत. तुह्मांस पत्र दिल्हें तें पाठविलें आहे. श्रीमंताबराबर आहेत. कळावें. सर्वदा पत्र पाठवून सांभाळीत असावें. मित्ती पौष शुद्ध १०. बहुत काय लिहिणें. कृपा लोभ असो दीजे. हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries