[१८४]                                        ।। श्री ।।             ११ मे १७६०.

राजश्री बाळाजी गोविंद गोसावी यांसि:-

अखंडितलक्ष्मीआलंकृतराजमान्य स्ने॥ मल्हारजी होळकर व जनकोजी शिंदे दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लिहीत जाणे.
विशेष. बुंदेलखंडा बकशी व सुमेरसाचा पुत्र रतनसा यांणी दंगा२७२ केला. त्यांस आपले मायेंत घेणें. प्रसंगानुरूप कांहीं अगत्याअगत्य खर्चवेच लागला तर समयावर दृष्टी देऊन करणें. बुंदेलखंडाचे ऐवजीं मजुरा पडेल. त्याजला हातीं घेऊन तूर्त समाधान करून हातीं घेणें याची पुढें दिक्कत पडेल. यास्तव अनमान करून नुकसानी कराल, ऐसें सर्वथा न करणें. प्राप्त समयावर दृष्टी देऊन वर्तणूक करून ज्यांत सरकार काम तें करणे. सु।। इहिदे सितैन मय्या२७१ व अल्लफ. र।। छ २४ रमजान. बहुत काय लिहिणें. हे विनंति.

मोर्तबसुद, वार

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries