[१९२]                                        ।। श्री ।।              २९ मे १७६०.

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः-

पो।। विश्वासराव२७६ बल्लाळ नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. पत्र पाठविलें तें पावलें. लिहिलें वर्तमान सविस्तर कळों आलें. ऐशियास, एतद्विशींचा सर्व अर्थ तीर्थरूपांनीं लिहिला आहे त्यावरून कळेल. खासास्वारी मजल दरमजल ग्वालेरपर्यंत आली. लौकरीच चमेल उतरून आग-याचे रोखें जाऊं. तिकडील सर्व वर्तमान वरचेवरी लिहीत जाणें. जाणिजे. छ १३ सवाल सु।। सितैन मया व अल्लफ. बहुत काय लिहिणें. हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries