संस्कृत भाषेचा उलगडा

४६ वरील पृथक्करणावरून दिसून आले की पूर्ववैदिकभाषात दोन प्रकारची पुरुषवाचकसर्वनामे असत, १) आत्मनायक ऊर्फ स्वस्मायक ऊर्फ अन्यव्यावर्तक सर्वनामे व २) परस्मायक ऊर्फ अन्यसमावर्तक ऊर्फ अन्यसमावेशक सर्वनामे. आत्मनायक सर्वनामांना आत्मनेपदे म्हटले असता चालेल व परस्मायक सर्वनामांना परस्मैपदे म्हटले असता चालेल. धातूंच्या पुढे आत्मनेपदे लावली म्हणजे त्या धातूंना आत्मनेपदी धातू म्हणत व परस्मैपदे लावली म्हणजे परस्मैपदी धातू म्हणत. आत्मनेपदी धातूंची रूपे क्रियाफलाचे कर्तृगामित्व दाखवीत आणि परस्मैपदी धातूंची रूपे क्रियाफलाचे कर्त्रितरगामित्व दाखवीत. असा भेद का होई याबाबींचे कारण दुसरे तिसरे काही एक नसून, एकच असे आहे की पूर्ववैदिकभाषात आत्मनायक व परस्मायक अशी दोन प्रकारची सर्वनामे असत व ती धातूंपुढे लावली म्हणजे सहजच क्रियेचे भोक्तृत्व इतरांना वर्जून फक्त कर्त्याकडे जाणारे किंवा कर्त्याबरोबर इतरांचा समावेश करणारे होई. संस्कृतभाषेतील आत्मनेपदी व परस्मैपदी असे जे धातूंचे दोन मोठे वर्ग आहेत ते वर्ग बनण्याचे गुह्य याहून जास्त खोल नाही.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries