संस्कृत भाषेचा उलगडा

दोघे तुल्यबल असून दोघांचा मिलाफ झाला व भाषेत दोन शिष्ट रूपे शिरली. मराठीतील दुसरे एक प्रत्यन्तर घेऊ. ज्ञानेश्वरीभाषेत सुंदरे गोपुरे असा प्रयोग येतो व वर्तमान मराठीत सुंदर गोपुरे असा प्रयोग होतो. कोण्या वर्तमान कवीने छंद: सुखार्थ किंवा हौसेखातर एकाच काव्यात सुंदर व सुंदरे असे अनेकवचनी दोन्ही प्रयोग केले तर त्यापासून अर्थ असा निष्पन्न होईल की, दोन्ही प्रयोग शिष्ट असून एक दुसऱ्याहून जुनाट आहे. सामाजिकदृष्ट्या अर्थ असा होईल की, कालाचे बहुत अंतर असणारे असे दोन समाज होते व एक दुसऱ्याचा वंशज होता. हाच दाखला वैदिककालीन समाजालाही लावता येईल. देवा रूप योजणारा समाज देवौ रूप योजणाऱ्या समाजाहून कालाने अंतरित असून जुनाट होता, तत्रापि वंशाने एक होता. प्रथमा त्रिवचनाची चार रूपे आहेत. पैकी देवास: याचा संक्षेप देवा: असल्यामुळे वस्तुत: भिन्न अशी तीनच रूपे आहेत. पैकी देवाँ: हे रूप देवा: या रूपाचा अनुनासिक पर्याय आहे. जुनाट रानटी आर्यात देवाँ: व देवे असे भिन्न प्रयोग करणारे दोन समाज असून, शिवाय देवास: हे रूप योजणारा तिसराही एक समाज होता आणि या तीन जुनाट समाजांचा मिलाफ होऊन वैदिक समाज बनला. द्विवचनाची दोन भिन्न रूपे योजणारे दोन भिन्न समाज होते म्हणून सांगितले, देवौवाल्यांचा
एक समाज व देवावाल्यांचा दुसरा समाज, हे दोन समाज देव शब्द द्विवचनी दोन भिन्न तऱ्हांनी असा चालवीत :

             १             २
१          देवौ          देवा
२          देवौ         देवा
३          देवौभ्यां     देवाभ्याम्
दोन्ही समाजाचा मिलाफ झाल्यावर दोन्ही समाजाच्या भाषांचाही मिलाफ झाला व दोन्ही भाषांतील उच्चाराला सुकर अशी रूपे संमिश्र समाजात शिल्लक राहून प्रचलित झाली. प्रथमा व द्वितीया यांच्या द्विवचनी देवौ हे रूप संमिश्र समाजाला उच्चारसुलभ वाटले आणि तृतीया, चतुर्थी व पंचमी यांच्या द्विवचनी देवाभ्याम् हे रूप सुलभ वाटले. हाच प्रकार अनेकवचनाच्या संबंधाने झाला. उपयुक्त तीन समाज देव शब्द अनेकवचनी तीन तऱ्हांनी चालवीत :

          १              २              ३
१       देवा:          देवे           देवाँ:
२       देवा:म्       देवेम्        देवान्
३       देवा:भि:     देवेभि:     देवान्भि:
४       देवा:भ्य:     देवेभ्य:     देवान्भ्य:
५       देवा:म्       देवेयाम्    देवानाम्
६      देवा:सु      देवेषु        देवान्सु

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries