संस्कृत भाषेचा उलगडा

५७ (४) दिवादि धातू : भृशार्थक यङ्पासून दिवादिग्णाची उप्तत्ति आहे. यङ् मधील ङिता वरून उघड होते की पाणिनीच्या मते यङांत सर्व धातू आत्मनेपदी असतात. परंतु पूर्ववैदिकभाषांत पाणिनीचा हा यङ् परस्मैपदीही चाले. दिव् ह्न देदीव्यति, सिव् ह्न सेवीव्यति, लिश् ह्न लेलिश्यति इ. इ. इ. यङ् फक्त आत्मनेपदी व यङ्लुक् फक्त परस्मैपदी चालतो असे वैय्याकरण म्हणतात. परंतु पूर्ववैदिकभाषांत यङ् व यङ्लुक् दोन्हीं आत्मने ह्न व परस्मै अशा दोन्ही पदी चालत. या दिवादींना श्यन्विकरण म्हणून पाणिनी म्हणतो. हा दिवादि वर्गही यङ् चा संक्षेप होऊन म्हणजे आद्य अक्षराचा लोप होऊन झालेला असल्यामुळे, यालाही साध्या धातूत गणण्याची सोय नाही, बाब अतीच स्पष्ट असल्यामुळे, उदाहरणे वगैरे देऊन जागा अडवीत नाही. फक्त एवढीच टीका करतो की परस्मैपदी यङापासून पाणिनीचा दिवादिगण निघाला आहे आणि आत्मनेपदी यङापासून कर्मणि क्रियापदे निघतात. जसे :

देदीव्यति = ( दे ह्न लोप) दीव्यति
देदीव्यते = ( दे ह्न लोप) दीव्यते (कर्मणि)
लेलिश्यति = ( ले ह्न लोप) लिश्यति
लेलिश्यते = ( ले ह्न लोप) लिश्यते (कर्मणि)
इ. इ. इ. इ.

शमादि आठ धातूंतील अ, य पुढे असता, दीर्घ होतो म्हणून पाणिनी सांगतो. याचा अर्थ असा की, पूर्ववैदिकभाषांत यङ् ची शाशाम्य्, ताताम्य्, दादाम्य, अशी रूपे होत होती. शो, छो, सो यांची शोश्यति, छोछ्यति, सोस्यति, इत्यादी रूपे होत, त्यापासून श्यति, स्य, छयति, ही रूपे संक्षेपाने निघाली. हाच न्याय इतर अनियमित म्हणून म्हटलेल्या धातूंना लावावा. दिवादिवर्गात एकंदर १४० धातू पाणिनी देतो.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries