संस्कृत भाषेचा उलगडा

(ए) लट् परस्मै मध्यमपुरुष अनेकवचन ह्न धातू + थ किंवा अथ.
गा + थ = गाथ, भृ + थ = भृथ, यु + थ = यूथ, विद् + अथ = विदथ, यज् + अथ = यजथ, यु थ या वाक्याचा अर्थ, तुम्ही जमता, असा आहे.
यज् अथ या वाक्याचा अर्थ, तुम्ही पूजिता असा आहे.

(ए) धातू + था. थ चा दीर्घ.
गा + था = गाथा, नी + था = नीथा.

(ऐ) लिट् मध्यमपुरुष द्विवचन: ह्न धातू + अथु (स्)

वम् + अथु = वमथु, वेप् + अथु = वेपथु, स्तन् + अथु = स्तनथु, वैप् + अथुस् या वाक्याचा अर्थ तुम्ही दोघे कांपता असा आहे. मूळ सर्वनाम अथु किंवा अथुस् असे दोन्ही प्रकारचे होते.

(ओ) लट् उत्तमपुरुष एकवचन ह्न धातू + मि भू + मि = भूमि, लक्ष् + मि = लक्ष्मि. कृ + मि = कृमि. कृ मि या वाक्याचा अर्थ, मी दुखवितो, नासतो, असा होता. त्यावरून कोणतीही वस्तू नासणारा जो प्राणी त्याला कृमि हा शब्द लागू लागला.

(औ) लङ् उत्तमपुरुष अनेक वचन ह्न धातू + म भी + म = भीम. शक् + म = शग्म. युध् + म = युध्म. युध् + म या वाक्याचा अर्थ, आम्ही झुंजतो, असा आहे.

(अं) लोट् प्रथमपुरुष एकवचन ह्न धातू + तु
दा + तु = दातु, धा + तु = धातु. पा + तु = पातु.

(अ:) लट् प्रथमपुरुष द्विवचन ह्न धातू + त्स (तर्)
मा+ तस् (ऱ्ह्) = मातर्. पि + तस् (ऱ्ह्) = पितर्. भ्रा + तऱ्ह = भ्रातर्. मा तऱ्ह् या वाक्याचा अर्थ, ते किंवा ती दोघें अन्न मोजून देतात, असा आहे. पि तऱ्ह् या वाक्याचा अर्थ, ती दोघे रक्षण करतात, असा आहे. मातर्, पितर्, भ्रातर, हे शब्द मूळचे द्विवचनी आहेत. यांना प्रातिपदिके समजून, यांना पुन्हा स्, औ, अस् इत्यादी विभक्तिप्रत्यय लागतात. मूळचे हे शब्द द्विवचनी वाक्ये असल्यामुळे, मातरौ म्हणजे मातापिता, पितरौ म्हणजे मातापिता व भ्रातरौ म्हणजे बहीणभाऊ अशा अर्थाचे एकशेष समास का होतात त्याचे कारण समजते.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries