संस्कृत भाषेचा उलगडा

६७ पृथक्करणार्थ नामांच्या आधी सर्वनामे घेण्याचे कारण असे आहे की क्रियाशब्द व सर्वनामशब्द हे प्राथमिक भाषेत प्रथम उदयास आले व नामशब्द क्रियाशब्दांच्या व सर्वनामशब्दांच्या मिश्रणापासून उत्पन्न झाले. असा प्रकार असल्यामुळे क्रियाशब्दांच्या वचनरूपांचे पृथक्करण केल्यानंतर सर्वनामांच्या वचनविचारांचा परामर्ष घेणे क्रमप्राप्त होते. अ, इ, उ, तू, स्, क्, य्, म्, न्, ह्म, हन्, अह्, तह्, त्व् ही प्राथमिक भाषेतील अत्यंत साधी सर्वनामे आहेत. यापैकी दोन, तीन किंवा चार सर्वनामांचा जोड होऊन खालील जोड सर्वनामे होतात.

१) अ+इ=ए
२) अ+त्= अत्
३) अ+म् =अम्
४)अ+न्=अन्
५) अ+स्= अस्
६) त्+अ=त
७) स्+अ=स
८) अ+इ+त्+अ=एत
९) अ+इ+स्+अ=एष
१०) अ+इ+न्+अ= एन

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries