संस्कृत भाषेचा उलगडा

३१. आता मध्यम पुरुषवाचकसर्वनाम जे पाणिनीय युष्म द् त्याचे पृथक्करण करू. पाणिनीला असे उत्तम पुरुषवाचक सर्वनामाचे खरे स्वरूप काय आहे ते कळले नाही, तसेच त्याला मध्यम पुरुषवाचकसर्वनामाचेही हृद्गत कळले नाही. वैदिकभाषेत त्व म्हणून एक सर्वनाम आहे. या त्व सर्वनामाचा अर्थ अन्य, भिन्न, निराळा, असा आहे. तसेच संस्कृतात तु म्हणून अव्यय आहे. हे तु अव्यय भेद किंवा पक्षांतर दाखविते. म्हणजे तु अव्ययाचा अर्थ भिन्न असा आहे. त्याप्रमाणेच वैदिकभाषेत त्वै म्हणून अव्यय आहे. हे तु अव्यय विशेष किंवा वितर्क दाखविते. म्हणजे त्वै या सर्वनामाचाही अर्थ भिन्न असा आहे. तद् (त सर्वनाम) तु, त्वै, व त्व हे सर्व शब्द भिन्नतावाचक ऊर्फ भेदवाचक आहेत व हे चारी शब्द एकाच पूर्ववैदिक मूळ शब्दापासून निघालेले आहेत. या चार शब्दांच्या जोडीचा पाचवा पूर्ववैदिक शब्द द्बै हे अव्यय आहे. हे द्वै अव्यय त्वै प्रमाणेच विशेष किंवा वितर्क दाखविते. म्हणजे द्वै चा अर्थ भिन्न, निराळा असा आहे. त्वै आणि द्वै ही एकाच शब्दाची दोन रूपे आहेत. द्वै शब्दाचा जोडीदार जसा त्वै शब्दा तसा त्व सर्वनामाचा जोडीदार द्व हा संख्यावाचक शब्द आहे. द्व चा अर्थ मित्र, निराळा, दुसरा. या द्व संख्यावाचकशब्दाचे द्वि, द्वा हे पर्याय आहेत. तात्पर्य, त्व, द्व, द्वि, द्वा, द्वै, त्वै, त्व व तु हे आठही शब्द एकाच पूर्ववैदिक मूळ शब्दापासून निघालेले आहेत. पैकी तु या शब्दाला उत्तम पुरुष वाचकसर्वनामाची रूपे जोडून मध्यम पुरुषवाचकसर्वनामाची रूपे वैदिकभाषेत बनतात. तु + हम् = तुहम् या सर्वनामाचा अर्थ, तु म्हणजे भिन्न, निराळा, दुसरा व हम म्हणजे मी मिळून दुसरा मी, असा आहे. आर्यांचे रानटी पूर्वज स्वत:ला मी म्हणत व स्वत: सारखी जी दुसरी व्यक्ती तिला दुसरा मी, मीच. पण माझ्याहून भिन्न मी, निराळा मी, असे म्हणत. हा दुसरा मी ऊर्फ तहम् शब्द येणेप्रमाणे चाले. हम् सर्वनामाच्या रूपांना पाठीमागे तु हा शब्द जोडावयाचा, एवढेच येथे कार्य आहे. तु चा सु, सु चा हु, हुचा उ, उ चा यु विकल्पाने होतो.

(१) तु + अहम् = त्वहम् = त्वम्
* प्राकृत तम्,
(२) तु + आवाम् = सु + आवाम् = हु + आवाम् = यु + आवाम् = युवावाम् = युवाम्, वाम्
* त चा स; स चा ह; ह चा य; आर्यभाषात होतो.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries