संस्कृत भाषेचा उलगडा

३६ हम् शब्द, सर्व अजन्त शब्द व सर्व हलन्त शब्द यांचे विभक्तीप्रत्यय पहाता, ते भादि किंवा सादि असे दोन प्रकारचे आहेत. पैकी भादि प्रत्यय अभि या जुनाट पूर्ववैदिक शब्दापासून निघालेले आहेत. अभिस्, अभ्यस्, अभ्य, अभ्यस्, अभ्याम् इत्यादी शब्दातील अ चा लोप होऊन भिस्, भ्यस् इत्यादी प्रत्यय निघालेले आहेत. अभि या कर्मप्रवचनीयाचा अर्थ जवळ कडे असा आहे. अभित: या कर्मप्रवचनीयाचा अर्थ सभोवती असा आहे. भक्ता हरि अमि, येथे अभिचा अर्थ शेजारी असा आहे. अभिचा अर्थ कडे असाही आहे. (अभिस्) चा म्हणजे भिस्चा अर्थ करण. भ्यस् चा अर्थ संप्रदान व अपादान आणि भ्यास् चा अर्थ करण, संप्रदान व अपादान. भ्य, भ्यम् चा अर्थ संप्रदान अभिचा अर्थ कडे व भिस् चा अर्थ कडून. देवेभि: म्हणजे देवांकडून. अभिला स् प्रत्यय लागला म्हणजे अर्थ कडून असा होतो. अभिला अ प्रत्यय लागला म्हणजे अर्थ कडे असा होतो आणि अभिला अ, अम्, आम् अस हे प्रत्यय लागले म्हणजे अर्थ कडे किंवा कडून असा दोन्ही होतो. स्वत: अभि शब्दाचे मूळ काय त्याचा अंदाज करण्यास काहीच साधना नाही. परंतु, भादि प्रत्यय या अभिपासून निघालेले आहेत हे निश्चायात्मक ताडिता येते. अभ्यन्त: या प्रत्ययात अभि शब्द स्वच्छ आहे. एकंदरीत अभि हा शब्द फार जुनाट आहे व त्यापासून निघालेले प्रत्ययही फार जुनाट आहेत.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries