सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

संगीन १ [ संगः ( संगिनी ) a kind of weapon = संगीन ]

-२ [ संगृह्णाति = संगिण्हइ = संगीन ] संगीन तयारी = comprehensive preparation.

संघष्टण [ संघर्षण पासून संघष्टण आला नाहीं. संघृष्ट पासून संघष्ट आणि संघष्ट पासून संघटण. धृष्ट असा धातू धरला. संघर्षणपासून सांघरण असें रूप व्हावें. तें वर्तमान मराठींत नाहीं संघष्टण आहे. (भा. इ. १८३६)

संच [ षच् समवाये = संच, सांचवणें ] (ग्रंथमाला)

सचकार [ सत्यंकार = सच्चँकार = सचकार ] ( भा. इ. १८३२)

संचळ [ सौवर्चल = सौच्चळ = संचळ ] ( भा. इ. १८३४)

सचोटी [ सत्यवृत्तिः = सचोटी ]

सच्च ( च्चा-च्ची-च्चें ) [ सत्य = सच्च (खरें) शस्य = सच्च (प्रशंसनीय ) ]

सच्चा १ [ शस्यं = साचें, सच्चें, सच्चा ]

-२ [ सस्यकः किंवा शस्यकः = सच्चा ( अप्रतिम साधू) ] शस्यक शब्दांतील श चा स पाणिनीय कालीन प्राकृतप्राबल्य दाखवितो.

सजण [ सज्जन = सजण ] ( स. मं.)

सजणा ! [ संज्ञा to be of the same mind, to understand one another = संजानानः = सजण ] one who is of the same mind with the speaker. सजणा हें संबोधन लावण्यांत फार येतें. सुजन शब्द निराळा.

संजाव [ फारसी ] (स. मं. )

संजोग [ संयुगः union, fit = संजोग ] union, fit.

सज्जा [ सद्या (सद् to sit) = सज्जा ] माडीवरील बसावयाची पुढची जागा.

सज्नीखान [ स्वर्जिकक्षार = सज्जिआखार = सज्जीखार ] (भा. इ. १८३४)

सटकन् [ सट्ट १० हिंसायाम् ] (धातुकोश-सडक २ पहा)

सटकन्, सटदिनि [ चटकर पहा ]

सटाणा १ [ षष्टिहायन = सटाणा ] षष्टि हायन म्हणजे मोठा हत्ती, त्यावरून सटाणा म्हणजे मोठा, अगडबंब.

-२ [ स्तनकः = सटाणा. स्तन् to thunder ]

सटी [ श्वठि:, श्वठ् १ असंस्कारे ] (धातुकोश-सठ पहा)

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries