सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

सणा सुदी चा [ क्षणस्य सुदिनस्य त्यत् = सणा सुदी च ( चा-ची-चें ) ]

सतका [ सत्कारः = सत्का, सतका ] a present to kings by subjects

सतत [ तन् ८ वृद्धौ. सततं, संततं = सतत ] ( धा. सा. श. )

सतरा [ सप्तापरदशन् ] ( अकरा २ पहा)

संतापणें [ संतप्यति = संतापणें ] (भा. इ. १८३३)

संतापवणें [ संतापयति = संतापवणें ] (भा. इ. १८३३)

सतावणें [ सत्रायते ( सत्रं पापं चिकीर्षति) = सतावतो ] (भा. इ. १८३३)

सत्तर १ [ सप्तति ] ( अकरा १ पहा)

-२ [ सप्तृदृशति ] (विंशति पहा)

सत्रंज [ शत्रुंजय: ( ३-२-४६) = सत्रंज ] सत्रंज हा शब्द फारशींत बुद्धिबळाच्या डावाला लावतात.

सत्रा [ सत्रा always (वैदिक) = सत्रा (मराठी अप्रकृत many besides the riglit one ) ] तुभ्यं ब्रह्माणि सत्रा दधिरे to thee songs have been offered always. सत्रा बोलणीं नकोत, सत्रा गोष्टी सांगतो, ह्या वाक्यांत सत्रा म्हणजे सोळा अधिक एक असा अर्थ नाहीं. सदा, पुष्कळ, अवांतर असा अर्थ आहे.

सत्त्वाथिला [ सत्वान्वित + ल = सत्वाथिला.
नामान्वित + ल = नामाथिला ]

संथ १ [ शंत (सुखी) = संथ ] संथ निजला आहे म्हणजे सुखी निजला आहे.

-२ [ संस्त् ( निजणें) = संथ ] संथ पडला आहे म्हणजे निजून पडला आहे.

संथा १ [ संस्तावः = संथाआ = संथा.
पाणिनि ३-३-३१ यज्ञे समि स्तुवः
समेत्य स्तुवंति यस्मिन्देशे छंदोगाः स देशः ]

-२ [ श्रंथा = संथा ( श्रंथ् १० to arrange संदर्भे ]

-३ [ संहिता = संथा ] वेदपाठाची संथा.

सदाफुली [ सदंपुष्पा = सदाफुली ] ( सायण on अथर्व - ४ कांड - ४ अनुवाक - सू. २० ऋ.).

संदूक [ सं + धुक्ष् to kindle : संधुशा = संदूक ] a kindling tapering cloth.

सनई १ [ स्वनिका = सानिका = सनई. स्वन् १ शब्दे ] सानिका, सानेयिका हे स्वनिकाचे अपभ्रंश आहेत.

-२ [ सानिका ( वाद्यविशेष ) = सनई, सणई ]

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries