भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

(४) वर जी ही भारतीय, हरिवंशीय, वैदिक व स्मार्त शरीरसंबंधक उदाहरणे नमूद केली ती सर्व एका स्त्रीशी एकाच बापाचा किंवा भावाचा शरीरसंबंध दाखविण्यापुरवी झाली. अनेक सपिंड पुरुषांचा एकाच सपिंड स्त्रीशी संबंध दाखविणारी वाक्येही इतिहासातून सापडतात. हरिवंशाच्या दुस-या अध्यायात असे लिहिले आहे की, दहा प्रचेत्यांनी व त्यांचा पुत्र सोम याने सोमाची मुलगी जी मारिषा तिचे ठायी आपापली तेजे घालून दक्ष प्रजापति निर्माण केला. पितृदुहितृसंबंधाचे तर हे उदाहरण आहेच. शिवाय आजा व नात यांचा संबंध या उदाहरणात दाखविला आहे, इतकेच नव्हे तर दहा आजे व एक बाप यांचा संबंध बापाच्या मुलीशी झाल्याचे लिहिले आहे. याच अध्यायात पुढे असे वर्णन आहे की सोमाचा मुलगा किंवा दौहित्र जो दक्ष प्रजापति त्याने आपल्या सत्तावीस मुली आपला बाप किंवा आजा जो सोम त्यास प्रजोत्पादनार्थ दिल्या. येथेही आजाचा व नातींचा शरीरसंबंध झाल्याचा दाखला मिळतो. हरिवंशाच्या तिस-या अध्यायात असे नमूद केले आहे की ब्रम्हदेवाचा पुत्र दक्ष याने आपली मुलगी ब्रम्हदेवाला दिली व तिजपासून प्रसिद्ध नारद झाला. हाही संबंध वरच्याच वर्गातला आहे. हे विचित्र संबंध वर्णिलेले, आणि तेही इतिहासकार व्यासांनी व वैशंपायनांनी वर्णिलेले ऐकून, सध्या आपल्याला जे आश्चर्य वाटते तेच आश्चर्य जनमेजय राजाला पाच हजार वर्षापूर्वी वाटले आणि आपण जो प्रश्न करू तोच जनमेजयाने वैशंपायनांना केला. जनमेजय विचारतो की, वैशंपायन हो ! हे असले अधर्म्य संबंध झालेले आपण इतिहास म्हणून वर्णिता याचा अर्थ काय ? जेव्हा जनमेजयाचे वैशंपायनांनी असे समाधान केले की पूर्वयुगी हे असले संबंध होणे हाच धर्म ऊर्फ समाजरूढी सर्वमान्य होती. वर्तमानकाली समाजशास्त्रदृष्ट्या आपण जे उत्तर देऊ तेच उत्तर वैशंपायनांनी दिले. वैशंपायनाला, भीष्माला व व्यासाला पूर्व इतिहास म्हणून या कथा परंपरेने माहीत होत्या व पुरातन इतिहास म्हणून त्यांनी त्या ज्ञानतः

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries