भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

३. सादर भगिनीनी सोदर भ्रात्यांच्या समागमाने स्वतंत्र कुटुंबसंस्था स्थापिल्यावर त्याही संस्थेत पुढे फेरफार झाले. सा-याच बहिणीना सारेच
भाऊ किंवा सा-याच भावांना सा-याच बहिणी सारख्याच आवडत असतील असे नाही. आवडनिवड रूपामुळे, स्वभावामुळे व कामसूपणामुळे व्हावयाला लागून, इतर भावांहून सर्वतोप्रकारे श्रेष्ठ अशा एखाद्या भावावर ब-याच बहिणींचे मन बसून, त्यांनी त्या एकाच्याच समागमात कुटुंबसंस्था चालविण्याचा संकेत केला. अशा स्थितीत स्वस्त्रीय बहुपत्नीक व एकपतिक कुटुंबसंस्था निर्माण झाली. याची ठळक उदाहरणे म्हटली म्हणजे दक्षाच्या साठ कन्यांची. ह्या साठांपैकी काहींनी धर्माशी, काहींनी सोमाशी, काहींनी कश्यपाशी पत्नीभावाने राहण्याचे पत्करले. अशा त-हेने बहुपत्नीक व एकपतिक कुटुंब अस्तित्वात आले. पक्षी इतर बहिणीहून गुणांनी सर्वतोप्रकारे श्रेष्ठ अशा एखाद्या बहिणीवर ब-याच भावांचे मन जाऊन, त्या भावानी त्या एकाच अप्रतिम बहिणीच्या समागमात राहून कुटुंब चालविण्याचा इरादा केला. अशा स्थितीत एकपत्नीक व बहुपतिक कुटुंब ज्याला म्हणतात ते निर्माण झाले. याचे ठळक उदाहरण म्हटले म्हणजे हरिवंशाच्या दुस-या अध्यायात वर्णिलेले प्रचेतसू बंधूंचे. ह्या दहा प्रचेतसू भ्रात्यांनी मारिषा नामक वृक्ष-कन्येशी समागम केला व त्या समागमापासून दक्षप्रजापति जन्मास आला. ह्या दोन प्रकारच्या कुटुंब संस्था निर्माण व्हावयाला इतरही कारणे झालेली असतील. इतर जमावांशी लढाई करताना यूथातील बरेच पुरुष मरून गेल्यास, राहिलेल्या एखाद्याशीच पत्नीभावाने राहण्याचा प्रसंग येऊन एकपतिक व बहुपत्नीक कुटुंब बनण्याचा संभव आहे. तसेच लढायांत स्त्रिया इतर यूथांनी पाडाव केला गेल्यास राहिलेल्या एखादीशीच संसार करण्याचे कपाळी येऊन बहुपतिक व एकपत्नीक कुटुंब घडले जाण्याचा संभव आहे.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries