महिकावती (माहिम)ची बखर

अभिमन्य १  परीक्षिती २  जन्मेजय ३
नरवाहन ४   वेणुवैस्यराज ५ अजानबाहु ६
सुबाहो ७   भीमसेन ८ कृपाभान ९
उर्ध्ववाह १०  सौभद्र ११ परीक्षिती १२
साहादेव १३  मदन १४  कुमार १५
केदार १६  लक्षमण १७  द्रोण १८
धनंजय १९   अर्जुन २० विक्रम २१
मेघनाद २२   देवदत्त २३ त्रीविक्रम २४

त्रीविक्रम राजा कुशळ ॥ कवण बांधि तयासि सळ ।।
क्षेत्रिया माजी प्रबळ ॥ शोमवंशि जो ।। ३६ ॥
सदावृत्ति राजन्न ।। नेमधारि त्रीविक्रम ।।
वरदि उपाशक त्रिलोचन ।। व्रत नेम सदा चालवी ।। ३७ ।।
शोमवंशासि व्रत सोमवार ।। यज्ञोपवीत निर्धार ।।
रुद्रगायित्री बिजाक्षर ।। जप त्रिकाळी ॥ ३८ ॥
स्नानसंध्या देवार्चन । शीवभक्ति कथाकीर्तन ।।
वेदमंत्री क्रियाकर्म । ब्रह्मभोजन सदाकाळी ।। ३९ ॥
व्रतबंध यकादशवर्षी । विवाह उपवार राजसी ॥
रजशिळा चतुर्थदिवशीं । शुद्ध होणें ।। ४० ॥
सिंहासन पंचकलशा । मुगुट मंजिरि घोषीं ।।
छत्रे पांच शोभेसीं । वधूवरा कारणें ।। ४१ ।।
वीरकंकण बाहुबंद । तोडर चरणि प्रसिद्ध ॥
बाहुटा पीतवर्ण उदित । नानावाद्यें ।। ४२ ।।

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries