महिकावती (माहिम)ची बखर

यका पासोन येक । परंपरा चालिली देख ।।
पूर्व दिशे राजे कवतुक । चालती जाणा ।। ५० ।।
विश्वपाळराजा पवित्र । सूर्यउपासक सर्वत्र ।।
त्रीभुवनि अगाध कीर्त। जयाचि असे ।। ५१ ।।
शोमवंशाचिया कन्या ।। सुर्यवंशासि देति आदरें करोनियां ॥
विवाह *पुण्या ।। चालत असे ॥ ५२ ।।
क्षेत्रिय महादारुण ॥ जे धनुर्धरविद्यापूर्ण ।।
तयां सन्मुख राहों सके कवण ।। जे क्षेत्रि बळाढ्ये ।। ५३ ।।
ज्यांची किर्ती दिगांतरी ।। वाखाणिली भविष्योत्तरी ।।
ते सूर्यशोमवंशि क्षेत्री ।। चालति सत्य ॥ ५४॥
आतां सोमवंशिचा नृपवर ।। राव विरुपाक्ष महाथोर ।।
क्षेत्रधर्मि धनुर्धर ।। महासमर्थ ।।
तो असतां हस्तनापुरी ।। कथा अपूर्व अवधारी ।।
जे ऋषि वदला वैखरां ।। अनुपम्ये ॥ ५६ ।।
राजकंन्या नागरी ।। सुलोचना नामे सुंदरी ।।
सखियां समवेत गंगे भितरी ।। क्रीडा करित होती ॥ ५७ ॥
जळक्रिडा सखियां समवेत ।। खेळत असतां गंगेत ।।
तवं अपूर्व वर्तलें तेथ ॥ तें आईका श्रोतेहो ॥ ५८ ।।
विचित्रविर्य भृगुनंदन ।। वह्याळि खेळतां आला नदी टाकुन ॥
दृष्ठि पडलें निधान ।। सुलोचना ते ।। ५९ ॥
त्याण्हे पाचारिलें तयेसी ।। तुं कवणाचि कवण होसी ।।
ते भयाभित वदनेसी ।। राहिली जाणा ।। ६० ।।
पुणती विचारि भृगुनंदन ।। तु कवणाचि गे कवण ।।
ते न बोले चि वचन ।। म्हणोन क्रोधे खवळला ।। ६१ ।।
रथा खाले उतरोनी ।। धावोन धरिली तियेचि वेणी ।।
वोढोन काढिली ततक्षणी ।। जळा बाहेरी ।। ६२ ।।

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries