महिकावती (माहिम)ची बखर

काळकोट १   कृतांतकाळ २ देवदत्त ३
अयाती ४   कपिलाक्ष ५ लक्षमण ६
वीरभद्र ७   द्वारकभीम ८ केदार ९
कपिलाक्ष १०   विरुपाक्ष ११ सोमदत्त १२
भद्राक्ष १३   चंद्रसेन १४ हेमवंत १५
बळिभद्र १६   अर्जुन १७ अंकुश १८
ताम्रध्वज १९  नीळध्वज २०  उग्रसेन २१
विश्वपाळ २२   देवगिरी २३ चंद्रसेन २४

इतुके राजे नांदले नवकोटि पर्वतीं ।। त्याचि परंपरा चालिलि तेथें ।।
पुढें कथा वर्तलि सत्य ।। ते आईका ।। १३५ ॥
इंद्रशेन राजा तेथिचा ।। प्रतापि धनुर्धर साचा ।।
धार्मिष्ट बोलणें सत्य वाचा ॥ सदावृती ॥ १३६ ॥
नांदतां नवकोटि पर्वती ।। कथा वर्तलि पुणती ॥
ते ऐकावि श्रोतीं ।। ऋषिवाक्ये ॥ १३७ ॥
उज्जनि नगरिचा नृपवर ।। शांतनादित्य धनुर्धर ॥
धार्मिष्ट महाथोर ।। दानसूर प्रतापि तो ॥ १३८ ॥
नांदतां उज्जनिनगरी ।। कंन्या असे तयाचि उपवरी ।।
नांवें पद्मावति सुंदरी ।। नागरा ते ॥ १३९ ।।
स्वयंवर मांडिलें तियेचें ॥ राजे मिळाले देशोदेशिचे ।।
इंद्रशेन स्वयंवरातें ॥ गेला तेथें ॥ १४० ॥

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries