महिकावती (माहिम)ची बखर

हे राजे दक्षण दिशे राहिले याचि गोत्रें ही गोत्रें शोमवंशास ।। छ.
ऐसि गोत्रें सांगितली ॥ शोमवंश वंशावळी ।।
भविष्योत्तर बोलिली ॥ शैयाद्रिखंडि निवाडा आहे ।। ९३ ॥
दुसरा निवाडा ब्रह्मोत्तरखंडी ॥ तेथें बोलि असे उघडी ॥
जे भविष्योत्तरि कथा बरवी ।। व्यासें बोलिली असे ॥ ९४ ।।
रुषिवाक्यं संपुर्ण ।। जेऐकतां निवति श्रवण ।।
ब्रह्मोत्तरंखडिचें निरोपण ॥ कथा अनुपम्य साजिरी ।। ९५ ॥
जैसें व्यासवाक्य उत्तभ ॥ ऐकतां हरति दोष दारुण
भविष्योत्तरिचें निरोपण ॥ जन्मेजयकृत्य ।। ९६ ॥
जैसे परीक्षितिसीं श्रवण जालें ॥ त्याचें दोष गेले ॥
शोमवंशिउद्धरिले ।। पूर्वज तेण्हे ॥ ९७ ॥
ते हे कथा पवित्र ॥ कलयुगि राहिला साक्षात्कार ।।
शोमवंश महासमुद्र ।। वरदिजे हे ॥९८ ॥
असंख्य संवत्सर लोटले ॥ युगप्रमाण चाललें ।।
हस्तनापुरि वर्तलें ।। अपुर्व येक ॥ ९९ ॥
हस्तनापुरि राजा शामकर्ण ।। शोमवंशि क्षेत्रि दारुण ।।
वह्याळि खेळतसे आपण ।। कोटिपर्वति तोगेला ॥ १०० ॥
तों ते पर्वति महास्थान ।। लिंगाकृति आहे जाण ।।
कोटि तिर्थाचे महिमान ।। शोभा दारुण शोभते ।। १०१ ।।
नाना वृक्ष मंडित ।। पुष्पें सर्वदा घवघवित ।।
तेथें गुंफा शोभांकित ।। देखिलां रायें ।। १ ०२ ।।
ते गुंफेमाझारी ।। आसनि बैसलीसे सुंदरी ।।
लावण्यरुप चराचरी ॥ जे अनुपम्य ।। १०३ ।।
ते रायें दृष्टि देखिली ।। जैसि विद्युल्लता भासली ॥
रांया मुर्छना आली ।। विरहता बाणलि आंगी ।।१०४ ।।

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries