मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ९३.

पौ छ. २६ जिल्हेज
श्रीशंकर,
१६९५ फाल्गुन वद्य ५.

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री हरीपंत तात्या स्वामीचे सेवेसीं-

पो कृष्णराव नारायण कृतानेक सां नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लेखन केलें पाहिजे. विशेप. राजश्री त्रिंबकराव मामा व राजश्री साबाजी भोंसले सेनासाहेबसुभा यांच्या व रुकनतद्दौले यांच्या भेटी बुधवारीं रात्रौ जाहाल्या. बोलणें ममतेचें जाहलें. आज उद्यां नबाब बंदगानअल्ली यांच्या भेटी होतील, येविशीं राजश्री सेनासाहेबसुभा यांनी लिहिलें आहे, व तीर्थरूप राजश्री नाना व राजश्री बापूरावजी सविस्तर सांगतील. त्यावरून कळेल. निरंतर पत्रीं कुशलार्थ लिहून संतोपवीत असावें. बहुत काय लिहिणें ? लोभाची वृद्धी करीत जावी. हे विनंती.

सेवेसीं लक्ष्मण बल्लाळ जोशी सां नमस्कार. विनंती लिा परिसोन सदैव परामृश करीत जावें. हे विनंती.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries