मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ९२

श्री.
पौ छ २६ जिल्हेज
१६९५ फाल्गुन वद्य ५

श्रीमंत राजश्री बापू स्वामींचे सेवेसीः-

सेवक भवानी शिवराम सां नमस्कार विनंति उपरी येथील कुशल ता छ १९ माहे जिल्हेज गुरुवासर मुकाम मौजे इदरगांव गुंजोटी जाणोन कुशल लेखन करीत असलें पाहिजे. विशेष. आह्मांकडील एक दोन पत्रें सेनासाहेब सुभा व सेवकांचे नांवे आली तीं पोंहचून संतोषवाप्ती जाहली. उत्तरे पाठविलीं तें पाहोन वर्तमान ध्यानास आलेंच असेल. प्रस्तुत इकडील वर्तमान तरीः आपले लिहिल्याप्रमाणें लांब लांब सोळा सतरा कोसांच्या मजली करीत मजल दर मजल छ १७ रोज भौम्य-वासरीं गुंजोटीवर मुकाम केला. तों पत्रामागें पत्रें दोन तीन मदारुलमहाम यांची आलींत कीं, तुह्मीं सत्वर येणें. त्याजवरोन तेच दिवशीं राजश्री मामा यांच्या तर्फेनें राजश्री शिवाजी विठल यांजकडील चिमणाजीपंत व आह्मी स्वार होऊन दोन प्रहर रात्रीस लष्कर दाखल जाहलों. दुसरे रोजीं मदारुलमहाम यांचे पुत्र डावरजंग डे-यास आले. भेटी जाहल्या, तदोत्तर आपण नबाबाच्या भेटीस गेलों. भेटीं होऊन कित्तेक भाषण जाहलें. याजकडील लक्ष आपलेशिवाय दुसरेकडे नाही. छ १८ रोजीं सेनासाहेवसुभा व राजश्री मामा यांच्याही भेटी बारा घटिका रात्रीस जाहाल्या. छ मजकुर आज आह्मांस बंदगानअल्लीच्या मुलाजमतीस मदारुलमहाम नेणार. सेनासाहेबसुभा व राजश्री. मामा यांचेहि भेटी घडतील. तदोत्तरः होईल वर्तमान सेवेसी लिहित असों. श्रीमंत दादासाहेब यांजकडोन राजारामपंत नामें वे भिकणखान आले. एक दोन किल्ले व दाहा वीस लक्षांची जहागीर देतों, साह्य व्हावें. त्यास याणीं अमान्य केलें; व लक्ष आपल्याकडे ठेविलें आहे. दुसरीकडे नाहींच नाहीं. बहुत काय लिहिणें ? कृपालोभ असे द्यावा. हे विनंती.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries