मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक १२१

श्री. ( नकल )
१६९६ चैत्र वद्य ६

उभयतांचे सेवेसीं. बाळाजी गणेश कृतानेक सां नमस्कार विज्ञापना येथील कुशल चैत्र वद्य ६ जाणून स्वकीय लेखन आज्ञा केली पाहिजे. इकडील सविस्तर श्रीमंत राजश्री तात्यासाहेबांचे पत्रावरून सविस्तर श्रवण होईल. मुख्यांचा एकदा साबित आहे. विलग पडणार नाहीं. खातरजमा असो द्यावी. मेहनतेस अंतर करीत नाहीं. चाकरी मगदुराप्रमाणें करीत आहों. पसंत करणार आपण आहेत. इलजाम येणार नाहीं. सर्व यथास्थित आहे. हरघडी कृपापत्रीं सांभाळ करावा. हे विज्ञापना, राजश्री सदाशिव हरी मकार नामकाचे तर्फेनें आले आहेत. बोलण्यांत आलें कीं, बाईंस व नानासाहेबांस एक करावें. कित्तेक मायेममतेच्या गोष्टी बोलतां, यांचे बोलणें होऊन, राजश्री हरिपंत तात्यांस समजल्याउपरी ,जें होईल तें सेवेसीं लिहून पाठवितों. हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries