मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक १२७

श्री.
पौ चैत्र वा १२ शुक्रवार
१६९६ चैत्र वद्य ९

राजश्रियाविराजित राजमान्य राजेश्री नाना व तथा राजश्री बाबूरावजी स्वामीचे सेवेसी:-

पोष्य हरी बल्लाळ साष्टांग नमस्कार विनंती उपरी येथील कुशल तो छ २३ मोहरम मुा नजीक परांडा जाणून स्वकीय कुशल लिहित जावें, विशेष, तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. लिहिला मजकूर सविस्तर कळला. उभयतांनीं राजश्री साबाजी भोंसले सेनासाहेबसुभा यांस पत्रें पाठविलीं, तीं त्यांणीं मला दाखविलीं. आह्मी सर्व मंडळी एकरूप असों. कोणेविशीं गुंता पडूं देत नाहीं. . ईश्वर उत्तमच करील. इकडील सविस्तर राजश्री तात्यांचे लिहिल्यावरून कळेल. श्रीमंत वीस कोस पुढें आहेत. आह्मी मोंगलांकरितां गुंतलों. याउपरी सडे होऊन पाठलाग करतों. त्यांणीं पळावयाची शकल काढली आहे. आह्मी पाठीस लागलों असतां कोठें जातात ! तात्या सुखरूप आहेत, चिंता न करावी. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दिजे. हे विनंती.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries