मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक १६२

श्री.
१६९७ जेष्ठ वद्य १

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री बाबूराव दादाजी गोसावी यांसीः

सेवक माधवराव नारायण प्रधान नमस्कार. सुा सीत सबैन मया व अलफ, चिकोडीकर देसाई यांचा ठराव हुजूर रा आपाजी शामजी यांचे विद्यमानें होईल. ठाणीं वगैरे राजश्री पांडुरंगराव गोविंद यांचे स्वाधीन लवकर करण्याविषयीं तुह्मांस पत्र पेशजीं गेलें आहे. त्याप्रमाणें हालीं ठाणीं वगैरे मशारनिल्हेचे स्वाधीन हुजरुन खिजमतगार पाठविले आहेत यांचे गुजारतीनें करून हुजूर लेहून सत्वर पाठविणें. दिरंग लाविल्यास परिच्छिन्न कार्यास येणार नाहीं. ठाण्यांत गोळी वाजविल्यास फौजेचा वगैरे पैका तुह्मांपासून सरकारांत भरून घेतला जाईल, हें स्पष्ट समजोन, ठाणी वगैरे स्वाधीन करणें. जाणिजे. छ २२ रावल, आज्ञाप्रमाण. लेखनसीमा. पो छ १५ राखिर जेष्ठमास, सी सीतसबैन.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries