मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक १७१

पौरा छ १५ जिल्काद.

श्री
१६९८ मार्गशीर्ष वद्य ३

रावसो मेहेरबान करमफर्याम मखलिसां सखाराम पंडत सलम लाहुताला. बादक षौक मुलाकत मसरत आयात मषहूद खातीर इतिहाद मासरबाद. येथील खुषी जाणून आपली षादमानी हमेषा कलमी करित आलां पाहिजे. दरींविला, बहुतरोज जाहाले. आपणाकडील खैर आफियतेची खबर मालुम होत नाहीं. दोस्तीचे जागां ऐसें न व्हावें. हमेशा आपली षादमानी कलंमी करित यावें. हाली नरसिंगराव कारकून या बा चेरथान पारचे पाठविले असे. आजरा एखलास घेतला पाहिजे. ज्यादा लिहिणें काय असे ? हे किताबती.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries