मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २६

श्री.
१६८७ आषाढ वद्य २

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री नरसिंगराव जनार्दन धायगुडे गोसावी यासीः-

सेवक रघुनाथ बाजीरावे नमस्कार, सा सित सितैन मया व अलफ, खासा स्वारी श्रावण वद्य पक्षीं बाहेर निघणार. तर तुह्मीं आपले पथकाचे लोकांची तयारी ऐव्हांपासून करून, भाद्रपद शुद्धांत हुजूर येणें. विलंब न लावणें. जाणिजे. छ १५ मोहरम. बहुत काय लिहिणें ?

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries