मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २८

श्री.
१६८७ आषाढ वद्य ३०

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री नरसिंगराव जनार्दन गोसावी यांसीः-
सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार, सुा सित सितैन मया व अलफ. तुमचे सरंजामांत महालः--
१ प्रो गुंजोटी.
१ प्रो सारबाड
१ प्रो घाट-नांदूर.
----

तीन महाल सरंजामांत आहेत. परंतु अमल बसला नाहीं. नबाब निजाम अल्लीखान याजकडील अमिलांनीं महाल दाबिले आहेत, याजकरितां नबाबास लिहिलें होतें. त्यावरून त्यांनी सदर्हू तीन महालचे अमिलांस तीन पत्रें व जमीदारांस तीन पत्रें, एकूण सहा पत्रें, पाठविलीं आहेत कीं, अमल सुरळीत देणें. ती तुह्मांकडे पाठविलीं आहेत. सनदा महालीं रवाना करून, ठाणीं आपले हवालीं करून घेऊन, महालचा बंदोबस्त करणें. सनदा पावल्याचा जाब पाठऊन देणें, जाणिजे. छ २८ मोहरम. बहुत काय लिहिणें ?

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries