मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ५६

श्री ( नक्कल )
१६९० पौष शुद्ध १०

रा बाबूराव नरसी, उपनाम खेर, गोत्र गौतम, सूत्र आश्वलायन, कसबें बावधन, प्रांत वाईं, गोसावी यांसी:-

सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार, सुा ( तिसा ) सितैन मया व अलफ. शके १६९० सर्वधारी नाम संवत्सरे, तुह्मीं हुजुर कसबे पुणे येथील मुक्कामीं येऊन विनंती केली कीं:-राजश्री भगवंतराव पंडित प्रतिनिधी यांणी आपणास मौजे कणूर संमेत हवेली प्रां वाईं हा गांव स्वराज्य तर्फेनें आपले कडील अमल, खेरीज हक्कदार व इनामदार करून दरोबस्त कुल बाब कुलकानू देखील इनाम तिजाई इनाम करार करून देऊन भोगवटीयास पत्रें करून दिल्हीं आहेत. त्याप्रों गांव इनाम चालत आहे. त्यास, स्वामींनीं कृपाळू होऊन, आपणाजवळ पत्रें आहेत तीं पाहून, त्या प्रों सरकारांतून करार करून दिल्हीं पाहिजेत. ह्मणून, त्याजवरून तुह्मी स्वामीचे राज्यांतील पुरातन सेवक; यास्तव तुमचें चालवणें आवश्यक जाणून, तुह्मांवरी कृपाळु होऊन, मौजे मार येथील रा भगवतंराव पंडित यांणी स्वराज्यतर्फेचा आपले वडील अमल, देखील इनाम, तिजाई देखील खेरीज हक्कदार व इनामदार करून दरोबस्त कुलबाब, कलकानू, इनाम देऊन पत्रें करून दिलीं आहेत तीं पाहून त्याजप्रों सरकारांतून करार करून दिल्हा असे. तरी, सदरहु लिहिल्याप्रमाणें मौजे माचा अंमल आपले दुमाला करून घेऊन, तुह्मीं व तुमचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनें इनाम अनभऊन, सुखरूप राहणें. जाणिजे. छ ८ रमजान, आज्ञा प्रमाण. ( मोर्तब व शिक्का असे. )

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries