मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ५२

( शिका)

श्री.
( नक्कल. )
१६९० भाद्रपद वद्य ७

राजमान्य राजश्री बाबूराव नरसी, उपनाम खेर, गोत्र गौतम, सूत्र आश्वलायन, वास्तव्य कसबा बावधन, प्रांत वाईं, यांसीं भगवंतराव त्र्यंबक प्रतिनिधि नमस्कार. सु। तिसा सितैन मया व अलफ. दिल्हें इनामपत्र ऐसीजे:- तुह्मीं हुजुर पुण्याचे मुक्कामीं येऊन विनंति केली जेः- आपण राज्यांत एकनिष्ठेनें सेवा केली आहे. याजकरितां कैलासवासी यमाजी पंत यांणीं आपणावर कृपाळू होऊन मौजे कणुर, संमत हवेली, प्रां वाईं, हा गांव सुभाकडे होता, तो दूर करून जिल्हेकडून कुलबाब, कुलकानू इनाम करून देऊन इनामपत्रें करून दिलीं आहेत, त्या प्रों चालत आहे. त्यास, तीं पत्रें मनास आणून, आपलीं पत्रें भोगवटीयास करून देऊन, पूर्ववत्प्रों इनाम चालविला पाहिजे. ह्मणून, त्यावरून, तीं पत्रें मनास आणून, तुमचें चालविणें आवश्यक जाणून, तुह्मांवर कृपाळु होऊन हालीं मौजे मार हा गांव जिल्हे कडून पूर्ववत् प्रों कुलबीब-कुलकानू हाली पट्टी व पेस्तर पट्टी देखील इनाम तिजाई खेरीज हक्कदार करून दरोबस्त इनाम दिल्हा असे. तरी तुह्मी व तुमचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनें अनभऊन सुखरूप राहणे. जाणिजे. छ २० जमादिलावल, बहुत काय लिहिणें? मोर्तबसूद.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries