लेखांक ५६.
श्री.
१६६९ पौष शुध्द ३. श्री राजा शाहू नरपति हर्षनिधान बाळाजी बाजीराव मुख्य प्रधान.

मा अनाम देशमुख व देशपांडे ता चाकण, पा जुन्नर, यांसी बाळाजी बाजीराव प्रधान. सु|| समान अर्बैन मया व अलफ. मौजे केळगांव ता मजकूर हा गांव बाबतीचा मुकासा श्री पांडुरंगाश्रम परमहंस वास्तव्य क्षेत्र आळंदी यांस, तीर्थरूप कैलासवासी राव यांनी दिल्हा आहे, त्या प्रो करार असे तरी तुम्ही मौजे मजकुरास ताकीद करून बाबतीचा ऐवज परमहंस स्वामीकडे सुरळीत देवीत जाणे. प्रतिवर्षी नूतन पत्राचा आक्षेप न करणे. जाणिजे. छ २ मोहरम. * आज्ञाप्रमाण
(लेखनसीमा)



लेखांक ५७.
श्री.
१६६९ पौष शुध्द ३. राजश्री देशाधिकारी व लेखक वर्तमान व भावी प्रां जुन्नर गोसावी यांसि-

छ अखंडित-लक्ष्मी-अलंकृत राजमान्य राजश्री बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार. सु|| समान अर्बैन मया व अलफ. मौजे केळगाव ता चाकण प्रां मजकूर हा गांव बाबतीचा मोकासा श्री पांडुरंगाश्रम परमहंस वास्तव्य क्षेत्र आळंदी यांस तीर्थरूप कैलासवासी राव याणी दिल्हा आहे. त्याप्रो करार असे. तरी तुम्ही मौजेमजकुरास ताकीद करून, बाबतीचा आकार होईल तो ऐवज श्री स्वामी यांजकडे सालदरसाल देववणे. प्रतिवर्षी नूतन पत्राचा आक्षेप न करणे. तीर्थरूप कैलासवासी यांचे पत्राप्रमाणे चालवणे. जाणिजे. छ २ मोहरम. आज्ञाप्रमाण.
(लेखनसीमा)

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries