लेखांक ७३.
श्री.
सुमारे १६६६.
राजश्री वासुदेवपंत गोसावी यांसी- अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने। अमरसिंग जाधवराव दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय लिहित जावे. विशेष. सातारे प्रांतांत आमच्या पाटिलक्या मौजे मांडव वगैरे गांव आहेत. तेथील पाटिलकीचे काम सुदामतप्रमाणे चालत असतां सुभानजी व भवानजी पोवार खटखट करितात म्हणोन समजले. त्यास पोवारमजकूर यांस ताकीद करावी की, सुदामप्रो। पाटिलकीची कामे चालत असतां उगीच किरकिर करावी हे उत्तम नाही. ऐसे सांगोन बंदोबस्त करवावा. र।। छ ७ रमजान. बहुत काय लिहिणेॽ हे विनंति. मोर्तबसूद.
श्रीशाहचरणी दृढ भाव।
अमरसिंग जाधवराव

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries