लेखांक ७७.
श्री.
(नक्कल असलेवरून)
माघ शु।। ४ रविवार शके १६७२. वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी-

विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय लेखन करीत असले पाहिजे. विशेष. काल तुम्ही गेलेस. त्यास तुमची त्यांची बोलीचाली होऊन काय मजकूर जाहला हे तुम्हांकडून कांहीच लिहून न आले. यास्तव आजी येथे; मुक्काम करून हे पत्र तुम्हांस लिहिले असे; तर त्याचा जाबसाल घेऊन बोली ठीक जाली असली तरी तुम्हीच लवकर येणे, अथवा काय मजकूर जाला असेल तो लिहून पाठवणे. त्यासारिखा विचार केला पाहिजे. आज रात्रौ तुमचे काही तरी लिहिले यावे. परंतु न आले यास्तव मुक्काम केला. आता पत्राचे उत्तर सत्वर पाठवावे. बहुत काय लिहिणेॽ हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries