मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक २०८.


१७०० पौष शुद्ध १२.

(श्रीसांब : ० सपुत्रो विजयते राजा शाहु नरपति हर्षनिधान रघुनाथ बाजीराव मुख्य प्रधान.)

राजमान्य राजश्री सदाशिव धोंडदेव यांसि :-
रघुनाथ बाजीराव प्रधान. सु॥ तिसा सबैन मया व अलफ. महादेवभट करमरकर यास बरें वाटत नव्हतें. सबब घरी गेले होते. त्यास, हालीं बरे होऊन मुंबईस गेले आहेत ह्मणोन बालाजी विश्वनाथ यांणी हुजूर विनंति केली कीं, त्यास पहिल्याप्रमाणें देवपूजा व अनुष्ठान सांगावयाची आज्ञा व्हावी. त्याजवरून हें पत्र तुह्मांस सादर केलें असें. तरी पहिल्याप्रों।। देवपूजा व अनुष्ठान महादेवभट यांस सांगणें. जाणिजे. छ १० जिल्हेज. आज्ञा प्रमाणे.

(लेखनावधि:)

 

 

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries