मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक २०९.


१७०० पौष वद्य १४.

(श्रीसांब : ० सपुत्रो विजयते राजा शाहु नरपति हर्षनिधान रघुनाथ बाजीराव मुख्य प्रधान.)

राजमान्य राजश्री सदाशिव धोंडदेव यांसि :-
रघुनाथ बाजीराव प्रधान. सु॥ तिसा सबैन मया व अलफ. अनुष्ठानाचे ब्राह्मण तेथें आहेत. त्यास आजपरियंत अनुष्ठान जाहलें असेल त्याची दक्षणा ब्राह्मणास देऊन निरोप देणें. देवाचे पुजेचे दोन ब्राह्मण आहेत. त्यांस मात्र पूजा करावयास ठेवणें. जाणिजे. छ २७ जिल्हेज. आज्ञा प्रमाण. देवाचे पुजेस राजश्री मोरेश्वरभट करमरकर व महादेवभट करमरकर आहेत, त्यांसच आतां पूजा करावयास ठेवणें. छ मजकूर. मोरेश्वरभट व महादेवभट हे न राहात, तरी यांचे ऐवजी दुसरे चांगले ब्राह्मण पाहून ठेवणें. छ मजकूर.

(लेखनावधि:)

बार.
पै॥ छ ९ मोहरम
मन तिसा सबैन.

 

 

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries