मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री. 

लेखांक २३५.


१७०१ आश्विन वद्य १०.

राजमान्य राजश्री सदासिव धोंडदेव यांसि:-
रघुनाथ बाजीराव नमस्कार. सु॥ समानीन मया व अलफ. बेहराम पारसी याचीं मुलेंमाणसें यांचे खर्चाची नेमणूक दरमां रुपये ५ पांच करार करून पेशजी सनद सादर जाहली आहे. त्यास, तुह्मांकडून येक रोजमरा मात्र पावला, बाकी पावलें नाहीं. सबब, हुजूर ई॥ छ १ जिलकाद सन तिसा ता।। सवाल अखेर सन मजकूर पावेतों हिसेब रुपये ५५. पैकीं आदा हुजूर रुपये ३० तीन व तुह्मांकडून रुपये ५ ऐकूण पस्तीस रुपये आदा होऊन, बाकी रुपये २० बीस तुह्मांकडून देविले असेत तर पेशजी सनद दिल्ही आहे ती पाहून सनदेंत ज्या महिन्यापासून रोजमरा देत जाणें ह्मणोन लिहिलें असेल तें हस्तकबिल धरून, हिशेब होईल त्यांत पस्तीस रुपये वजा देऊन, बाकी वीस रुपये देविले आहेत. यांत जे निघतील ते देणें. पुढें सदरहूप्रमाणें पांच रुपये दरमहा देत जाणें. जाणिजे. छ २३ सवाल. आज्ञाप्रमाण.

(लेखनावधि:)

पो।। छ ३ जिलकाद सन समानीन.
बार.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries