मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक ३३९.

१७२२ मार्गशीर्ष शुद्ध ८.

राजश्री कासीराव होळकर गोसावी यांसि
सकलगुणालंकरणअखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने॥ बाजीराव रघुनाथ प्रधान आशिर्वाद उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें विशेष प्रांत खानदेश येथील कानगोईचें वतन खंडो गंभीरराव व चिंतो विठ्ठल यांचे त्याची जफ्ती पेशजी सरकारांत जाहाली आहे त्यास चिंतो विठ्ठल आपले तीर्थरूप मृत्यु पावले ऐशास सदरहू वतनाची जफ्ती मोकळी करून वतन आपल्याकडे चालविलें पाहिजे ह्मणोन चिंतो विठल यांचे पुत्र राजश्री त्रिंबकराव चिंतामण यांणी हुजूर विनंती केली त्याजवरून प्रातंजकुराचे कानगोईचे वतन पों।। चिंतो विठ्ठल यांचे हिश्शाची जफ्ती हाली मोकळी करून चिंतो विठ्ठल मृत्यु पावले त्यांचे पुत्र त्रिंबकराव चिंतामण याजवर कृपाळू होऊन प्रांत मा॥ येथील कानगोईचे वतन यांचे यांजकडे चालवण्याची आज्ञा करून हें पत्र तुह्मास लिहिलें असे तरी तुह्मांकडे प्रांत मजकूरपैकी माहाल आहेत तेथील कमावीसदारास व जमिनदारांस ताकीद करून लिहिल्याअन्वयें वतन व हक्करुसूम इनाम व मानपान कानूकायेदसुध्धा चिंतो विठ्ठल याजकडे पेशजी सुदामत चालत आल्या प्रों।। त्रिंबकराव चिंतामण यांजकडे चालवणें व कानगोईचे वतनाचा शिरस्ता कागदपत्राचा पूर्वी मोगलाई अमलांतील असेल त्याप्रमाणें कागदपत्र मारनिल्हेचें दफ्तरीं पेशजी सनदेप्रमाणें देवीत जाणें जाणिजे छ ६ रजब सु॥ इहिदे मया तैन व अलफ बहुत काय लिहिणें हे आशिर्वाद.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries