मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक ३४३.

१७२२ पौष वद्य ४.

राजश्री अतांजी हरी ठाणे निऱ्हाळे स्वामी गोसावी यांसि :-
सेवक बळवंतराव नागनाथ नमस्कार सुमा ईहिदे मया तेन व अलफ. मौजे निऱ्हाळें ता।।. देपूर पा।। संगमनेर येथील कुळकर्ण चिंतो विठ्ठल याचे आहे त्याची जप्ती पेशजी सरकारांतून होऊन तालुके पट्याकडे सांगितली आहे. हाली मोकळी करून चिंतो विठल मृत्यु पावले त्यांचे पुत्र राजश्री त्रिंबकराव चिंतामण याजकडे मौजे मजकूरचे कुळकर्ण पेशजीप्रों।। मारनिलेकडे चालवावयाची हुजूरून सनद छ २६ जमादिलाखरची सादर जाहाली त्याजवरून तुह्मांस लिहिलें असे तरी मौजे मजकूरचे कुळकर्ण मारनिले अनुभवितील तुह्मी दखलगिरीं न करणे. मारनिले यांनी बापूजी शामराज यांस कुळकर्णाचे गुमस्तगिरीचे काम सांगोन पाठविले आहेत याचे हातें कुळकर्णाचे कामकाज घेणें. रवाना छ. १८ साबान. बहुत काय लिहिणे ?

298 2

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries