मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीनाथ स॥

लेखांक ३६४.

नकल.

१७३२ चैत्रशुद्ध १५.

राजश्री जनार्दन बलाल गोसावी यांसि :-
5 अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य श्नो।। दौलतराव सिंदे दंडवत सु॥ अशर मया तैन व अलफ राजश्री त्रिंबकराव चिंतामण यांचे तीर्थरूपापासून रुपये घेऊन केसो शामराज व बाबूजी मल्हार व नारो केशव जोशी कुलकर्णी मौजे साकेगांव पे॥ सेवगांव यांनी आपल्याले हिशाचे वतन गाहाण ठेऊन गाहण खत लिहून दिल्हे त्यांत करार की ऐवज मुदतीस न दिल्ह्यांस वतन डुलेल अनभव करावा या प्रमाणें आपले कुलदैवताचे शफथपूर्वक व कसबे तिसगांव पा॥ मजकूर येथील कुलकर्णपण चिमणाजी सदाशिव व आत्माराम सदाशिव कुळकर्णी यांनी आपल्याले वतन गाहणखत साकेगांवकराप्रमाणें करार लिहून दिल्हे त्याजवरून मुदती भरून गेल्या यांजकरितां त्र्यंबकराव चिंतामण यांनी आपले तर्फेनें वतनाचे वहिवाटीवर कारकून पाठविले असतां वतनाचे हक्कदस्तूर व वतनबाब मानपान त्यास सोपून न देतां दंडेली करीतात ह्मणोन विदित जाले त्याजवरून हें पत्र तुह्मांस लिहिलें असें तरी तुह्मी हरो गांवकरी यांसि बोलावून आणून त्र्यंबकराव चिंतामण यांजपासी खतें पत्रें आहेत ती आणवून पांच मेलवून उभयतांचे लेखाची चौकसी करून वाजवी पत्र व करार अन्वयें वतनाची (सिका) वहिवाट दो दोन गांवची त्र्यंबकराव चिंतामण यांजकडे सुरळीत चालतें करणें लेखपत्र असता दंडेली करीत असल्यास निक्षून ताकीद करून वहिवाटीस दिक्कत न पडेतें करणें जाणिजे छ १४ रबिलाबल बहुत काय लिहिणे हे विनंती मोर्तब.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries