मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक ३६७.

नकल.

१७३२ भाद्रपद व॥ ११.

राजश्री बनाजी बाबाजी गोसावी यांसि
5 अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नो।। मनोहरगीर सुभेदार तो।। त्रिंबक वगैरे नारायण सु॥ इसने अशर मयातैन व अलफ. राजश्री त्रिंबकराव चिंतामण यांणीं पुण्याचे मुकामीं समजाविलें कीं संवस्थान पेठ व पो।। हरसुल येथील कानगोईचे वतन आमचे तीर्थरूप चिंतो विठ्ठल यांणी खंडो गंभीरराव याजपासून खरीद घेतलें त्याची जप्ती पेशजी सरकारांतून जाहाली होती त्याची मोकळीक होऊन आह्मांकडे चालवावयासी सरकारची सनद गोविंदराव सदाशिव सुभे प्रांत बागलाण वगैरे यांचे नांवे छ ४ रजब सन इहीदेयातैनांत सादर जाली परंतु हालीमाजी वगैरे दंग्यामुळे वहिवाटीस माहाली आह्माकडून कारकून गेला नाही. त्यास सरकार सनदेअन्वये संवस्थान व पों।। मजकूर येथील कानगोईचे वतन आमचें आह्माकडे चालविले पाहिजे ह्मणून त्याजवरून अलाहिदा सरकारच्या सनदा सनसीतसीतैन व स इहीदे मयातैनचे साली जाहल्या आहेत त्या पाहून सदरहू वतन मारनिलेकडे चालतें करून हे सनद तुह्मास सादर केली असे तरी संवस्थान पेठ व पो।। हरसूल येथील कानगोई वतनाचा हकरुसूम व इनाम व पानमान कानूकायदेसुध्धां चिंतो विठ्ठल याजकडे पेशजी सुदामत चालत आल्याप्रों।। त्यांचे पुत्र त्रिंबकराव चिंतामण याजकडे सुरळीत देवऊन कानगोईचा सिरस्ता कागदपत्र मोगलाई अमलातील असेल त्याप्रो।। मारनिलेकडे चालवणे. र॥ छ २४ शाबान बहुत काय लिहिणे ? मोर्तब.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries